भाज्यांचे दर पुन्हा वाढले...

वाटाण्याचे भाव शंभरीपार असून कोबी आणि फ्लॉवरचे दरही 80 ते 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.

Updated: Jun 29, 2021, 08:24 AM IST
 भाज्यांचे दर पुन्हा वाढले... title=

 मुंबई :  राज्यभर झालेल्या पावसामुळे मुंबई-ठाण्यातील बाजारांमध्ये भाज्यांची होणारी आवक कमी झाली आहे. याचा थेट परिणाम दररोजच्या बाजारातील भाज्याच्या किंमतीवर झालाये. किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर किलोमागे 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याचे दर घाऊक बाजारातच 120 रुपये किलोवर गेले असून किरकोळ बाजारात 150 रुपये किलो दराने वाटाणा विकला जातो आहे.

 गेल्या आठवड्यात 40 ते 50 रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या फळभाज्या 60 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. येत्या काळात अधिक भाववाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणं आहे.तर घाऊक बाजारात मेथी, शेपू, माठ या पालेभाज्यांचे दर 25 ते 35 रुपये जुडीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. तर कोथिंबीर 20 ते 25 रुपये प्रतिजुडी आहे. 

वाटाण्याचे भाव शंभरीपार असून कोबी आणि फ्लॉवरचे दरही 80 ते 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. दुधी, काकडी, गाजर, तोंडली, भेंडी या फळभाज्या 60 ते 80 रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत. 

एकूणच काय तर भाज्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाल्यामुळे सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे.