सलमान म्हणतो 'प्रेमात' मीच 'लकी'

सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वत;ची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरलेली नाही. मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो.

Updated: Feb 20, 2012, 10:58 AM IST

www.24taas.com

 

सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वत;ची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरलेली नाही. मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो. आश्चर्य वाटतंय ना? ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, झरीन ही सलमान खानची गर्लफ्रेन्डची लिस्ट ही न संपणारी. मात्र सलमानचं अफेअर सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते ऐश्वर्या रायसह.

 

हम दिल दे चुके सनम या सिनेमाच्या दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनही एकत्र आले. मात्र या प्रेमात काटेच अधिक आहेत याची प्रचीती ऐश्वर्याला आली आणि सलमानचं हे सर्वात गाजलेलं प्रेमप्रकरण संपुष्टात आलं. यानंतर सलमानच्या आयुष्यात आली कतरिना कैफ. सलमानच्या या नव्या पार्टनरला प्रेक्षकांनी खूपच पसंत केलं. त्यामुळे ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनही ही मैत्री अधिक खुलली.

 

हे दोघे लग्नगाठीत बांधले जाणार असंही बोललं जायचं मात्र नंतर लगेचच या दोघांच्या लग्नाऐवजी ब्रेकअपच्याच चर्चा अधिक रंगू लागल्या. कतरिना कैफनंतर सलमानचं नाव झरीनशीही जुळलं गेलं. झरीनमध्ये कतरिनाची झलक दिसते त्यामुळेच सलमान झरीनकडे आकर्षित झाला असंही बोललं गेलं मात्र सलमानचं हे अफेअरही काही यशस्वी होऊ शकलं नाही.

 

त्यामुळे सलमान प्रेमाच्या बाबतीत अनलकी असल्याचं बोललं जातं मात्र खुद्द सलमानला हे मान्य नाही. एकूणच सलमान खानची प्रेमकहाणी ही त्याच्या फिल्मपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग वाटते. कारण प्रेमामध्ये अपयश येऊनही सलमान खान काही हार मानायला तयार नाही त्यामुळे सलमान खानकडे बघून हेच म्हणावंस वाटतंय की प्रेमा तुझा रंग कसा?