तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग, ३२ ठार

आंध्रप्रदेशमधील नेल्लोरमध्ये तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. त्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू एक्सप्रेसच्या एस-११ डब्याला लागलेल्या आगीत ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Updated: Jul 30, 2012, 01:23 PM IST

www.24taas.com, नेल्लोर

 

आंध्रप्रदेशमधील नेल्लोरमध्ये तामिळनाडू एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. त्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू एक्सप्रेसच्या एस-११ डब्याला लागलेल्या आगीत ३२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर या आगीत २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

पहाटे पाचच्या सुमारास दिल्लीवरुन चेन्नईला जात असलेल्या तामीळनाडू एक्सप्रेसला आंध्र प्रदेशातील नेल्लोरजवळ रेल्वेला आग लागली. एस-११ डब्यातल्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

अपघातानंतर नेल्लोरचे जिल्हाधिकारी श्रीधर यांनी अपघातग्रस्त ट्रेनची पाहणी केली आहे. जखमींना नेल्लोरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या आगीत ३२ प्रवासी ठार झाले आहेत. त्यामुळे ही आग अत्यंत भीषण होती. मात्र आगीचे प्राथमिक कारण समजले असले तरी, अजून मृतांचा एकूण आकडा समजू शकलेला नाही.