"रामदेवांवरील हल्ल्यात संघाचा हात"- दिग्विजय सिंग

योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप द्ग्विजय सिंग यांनी केला आहे. आणि शाई फेकण्याचं काम करणारा मनुष्य हा काँग्रेस विरोधक म्हणजेच भाजपशी संबंधित आहे.

Updated: Jan 15, 2012, 12:03 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप द्ग्विजय सिंग यांनी केला आहे. आणि शाई फेकण्याचं काम करणारा मनुष्य हा काँग्रेस विरोधक म्हणजेच भाजपशी संबंधित आहे.

दिग्विजय सिंग म्हणाले, “रामदेवांवर काळी शाई फेकला गेल्याचा व्हिडिओ पाहिल्यावर या घटनेमागे राजकारण आहे असं मला वाटतं. हे एक मोठं षड्यंत्र आहे. रियल कॉज ही एनजीओ चालवणाऱ्या कामरान सिद्दकीने ही शाई उडवली होती. कामरान पहिल्यापासून काँग्रेस विरोधक आहे. निवडणुकीत आमचे उमेदवार परवेझ हाश्मीलाही कामरानने विरोध केला होता. त्यांच्या एनजीओला राजगचं सरकार असताना सरकारी खजिन्यातून किती पैसा मिळाला याची चौकशी केली जावी.”

चेन्नईमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांनी बाबा रामदेव यांच्या हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला. घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.