दादाकडून पराभवाचे खापर फलंदाजांवर

पुणे वॉरियर्सचा कर्णधार सौरभ गांगुली याने पराभवाचे सगळे खापर फलंदाजांवर फोडले आहे. तर अॅडम गिलक्रिस्टने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे.

Updated: Apr 14, 2012, 03:47 PM IST

www.24taas.com, मोहाली 

 

पुणे वॉरियर्सचा कर्णधार सौरभ गांगुली याने पराभवाचे सगळे खापर फलंदाजांवर फोडले  आहे. तर अॅडम गिलक्रिस्टने या विजयाचे श्रेय  गोलंदाजांना दिले आहे.

 

 

पराभवाचे सगळे खापर फोडताना गांगुली म्हणाला, विजय मिळविण्यासाठी धावफलावर धावा तरी असायला हव्यात. यापुढील सामन्यात फलंदाजांनी जबाबदारी ओळखायला हवी. नाणेफेक जिंकणे सर्वांत महत्त्वाचे होते. मी जरी नाणेफेक जिंकलो असतो, तरी प्रथम गोलंदाजीच केली असती.

 

 

अर्थात, पंजाबच्या गोलंदाजांचे श्रेय मला कमी करायचे नाही. त्यांनी कमालीची अचूकता राखली होती. टी २० सामन्यात धावफलकावर किमान १५०धावा तरी नोंदल्या जाणे आवश्‍यक आहे. फलंदाजीत आम्हाला खूप सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

 

पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सचा डाव अवघ्या ११५ धावांत गुंडाळला गेला. या धावांचे पाठलाग करताना १७.४ षटकात २ विकेटच्या बदल्यात ११६ धावा करत पंजाबने पहिला विजय नोंदवला. दरम्यान, अॅडम गिलक्रिस्टने या विजयाचे श्रेय  गोलंदाजांना दिले आहे. पंजाबने सलग दोन पराभव स्वीकारल्यानंतर हा विजय पंजाबला मिळाल्याने मालकीन प्रीती झिंटा खूश आहे. या खूशीत तिने टी शर्ट वाटले.