www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये आज 200 बौद्ध बांधवांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बुद्द गयाला घेवून जाण्यासाठी मुंबई,पुणे नाशिक आणि औरंगाबाद जिल्हातूनं लोक या टुरसाठी शहरात आले होते. मात्र टुरला जाण्यासाठी आल्यानंतर अचानक टुर ऑपरेटर पळून गेल्यामुळे प्रत्येकाला तीन हजार रुपयांचा फटका बसला आहे.
औरंगाबादमध्ये सुनील वाव्हळे या टुर ऑपरेटरने राज्यातल्या बौद्द बांधवासाठी बुद्ध पोर्णीमेनिमीत्त बौद्ध गयासाठी टुर आयोजीत केली होती.त्यासाठी प्रत्येकाकडून 3000 रुपये घेण्य़ात आले होते. या टुरसाठी राज्यातून दोनशे लोक औरंगाबादमधल्या बुद्ध लेणी परिसरात आले होते. गेल्या तीन दिवसापासूनं या लोकांचा मुक्काम लेणी परिसरात होता. आज गयाला जाण्यासाठी ट्रव्हल्स देखील आल्या होत्या.त्यामुळे लोकांनी जाण्याची तयारी देखील केली.मात्र अचानक ट्रव्हल जाणार नसल्याचं या सर्वांना सांगण्यात आल.त्यानंतर टुर ऑपरेटर देखील पळून गेला.त्यामुळे लोकांचे पैसे बुडाल्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या टुरसाठी लोकांना फक्त तीन हजार रुपयामध्ये 20 गावे दाखवण्याचे अमीष या वाव्हळे टुर ऑपरेटरने दाखवले होते.
यामध्ये पंधरा हजार रुपये सरकारकडूनं देण्यात येत आहेत.त्यामुळे इतक्या कमी पैशात नेत असल्याचा अमिष या सर्व लोकांना दाखवण्यात आल होतं. त्यामुळे याबाबत बेगमपुरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.