विहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 6, 2013, 12:39 PM IST

www.24taas.com,औरंगाबाद
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.
वाळूज परिसरात ही घटना घ़डलीये. राजू बिडवे असं आत्महत्या केलेल्या शेतक-याचं नाव आहे. त्य़ांनी त्यांच्या शेतात दोन विहिरी खोदल्या. मात्र दोन्ही विहिरींना पाणी लागलं नाही.
दुष्काळात शेताला पाणी मिळण्याची आशा मावळल्यानं निराश झालेल्या शेतक-यानं विष पिऊन आत्महत्या केलीये.
गेल्या पंधरा दिवसात मराठवाड्यातील तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. दुष्काळ शेतक-यांच्या मुळावर उठलाय.