मुबंई : रंगामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठवून दिसते. आनंद झाल्याची भावना दिसून येते. रंगामुळे 'सकारात्मक ऊर्जा' प्राप्त होते.
रविवार : या दिवशी गुलाबी, सोनेरी आणि नारिंगी रंगाला विशेष महत्व आहे. आठवडा संपल्यानंतर रविवारी आपला थकवा दूर होता. या दिवशी नवीन कपडे परिधान करु नये, असा सल्ला दिला जातो.
सोमवार - सामवार म्हणजेच चंद्र दिवस. चमकणारा चांदी कलर. या दिवशी पांढऱ्या रंगाला जास्त महत्व असते. हा दिवस क्रिम, आकाशी आणि फिकट पिवळा म्हणून ओळखले जाते. मात्र, पांढरे वस्त्र परिधाण करणे शुभ मानले जाते. या दिवसाची सुरुवात शांतीपूर्ण असते. या दिवशी पांढऱ्या रंगाला प्राधान्य द्या.
मंगळवार - हा दिवस हनुमानचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे महत्व म्हणजे भगवा रंग. याला ऑरेंजही संबोधले जाते. या दिवशी मंगळ ग्रहाचा रंग चेरी रेड म्हणजेच लाल लंगाशी मिळता जुळता असतो. तो सौभाग्याचे दार उघडे करतो.
बुधवार - बुधवार देव हा गणपतीचा. ज्याला दुर्वा अधिक आवडतात. या दिवसाचे महत्व हिरव्या रंगाला आहे. बुध ग्रह स्वत: हिरव्या रंगाचा असतो. ज्यांची वाणी कर्कश आहे. त्यांनी फिकट हिरवा रंगाचा वेश परिधान केला पाहिजे. तर भडक बोलणाऱ्यांनी श्वेत रंगाचा वापर केला पाहिजे.
गुरुवार - गुरू ग्रह स्वामी आणि साई बाबा आहे. गुरु हा स्वत: पिवळ्या रंगाचा आहे. त्यामुळे या दिवसाचा रंग पिवळा. या दिवशी सोनेरी, गुलाबी, नारंगी आणि पर्पल या रंगाचा वापर करु शकता. मात्र, पिवळी शेड एकदम चांगली. हा विजय दिवस म्हणून ओळखला जातो.
शुक्रवार - हा आईचा दिवस म्हणून ओळखला जातो. तो सर्वव्यापी जगाची माता दिवस म्हणून ओळखतात. नेहमी स्वच्छ पांढरे कपडे परिधान करावे. या दिवशी मिक्स रंगाचे प्रिंटेड कपडे चालतात. लांब लाईन, चेक्स आणि लहान प्रिंटचे कपडे वापर परिधान करावे आणि यश प्राप्त करावे.
शनिवार - या दिवशीचा रंगा निळा आहे. हा रंग मनातील चढाव-उतारचा असतो. आत्मविश्वासामध्ये वृद्धीवाढीसाठी जांभळा, वांगी, गडद निळा, नेव्ही ब्लू, आकाशी चांगला. शनिवार अनकुल स्थिरता देतो. या दिवशी निळा रंगाचे शेड आपल्याला चांगले यश देतो.