www.24taas.com, नवी दिल्ली
टीम इंडियाचे दोन स्टार बॅट्समन विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणाने नवं रूप घेतलं आहे. आयपीएल – ६ च्या एका मॅचमध्ये दोघांच्या झालेल्या शाब्दिक चकमकीने मात्र जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. अशीच काहीशी घटना याआधीही आयपीएलमध्ये घडली होती. फास्ट बॉलर एस. श्रीशांतला हरभजन सिंगने केलेली मारहाण याने श्रीशांत मात्र चांगलाच भडकला होता. पण हरभजन सिंगने मला कानाखाली मारली नव्हती असे श्रीशांतने स्पष्ट केले आहे.
श्रीशांतने ट्विटरवर ट्विट केलं आहे. की, हरभजन सिंग मॅच हरल्यानंतर स्वत:चा संयम हरवून बसला होता. आणि मी जेव्हा त्याला हाथ मिळविण्यासाठी जात होते. तेव्हाच त्याने मला मारण्याचा प्लान केला होता. मात्र त्याने आपला सगळा राग मला कोपर मारून माझ्यावर काढला. मात्र त्याने मला कानाखाली मारली नाही. त्याने हे ही सांगितले की, आपण व्हिडिओ पाहिला आहे. की मॅच हरल्यानंतर हरभजनला राग केवढा अनावर झाला होता. आणि त्यामुळे तो असा वागला.
गंभीर-विराट यांच्यात काल झालेल्या वादाबद्दलही त्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने त्याच्या प्रकरणातील नाराजीही व्यक्त केली. जेव्हा की, भज्जीने मला कानाखाली मारलीच नाही तर त्या प्रकरणात असं काही का आलं याबाबत मला आश्चर्य वाटतं आहे. श्रीशांत आणि भज्जी यांच्यातील कानाखाली मारण्याचा हा वाद २००८ मध्ये झाला होता. तेव्हा श्रीशांतने हरभजननी कानाखाली मारल्याचा आरोप लावला होता. आणि तो मैदानात बराच वेळ रडतही होता.