www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आशिया कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन टिमकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला असला तरी टीम इंडियाच्या चाहत्यांची आशा कायम आहे. भारतानं आशिया कपमध्य टीकून राहावं, अशी चाहत्यांची साहजिकच इच्छा आहे... आणि तशी संधीदेखील भारताला आहे.
आज सुरू असलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश सुरू असलेल्या सामन्यात बांग्लादेशनं पाकिस्तानला पछाडलं तर आपोआपच भारत आशिया कपच्या फायनलमध्ये दाखल होणार आहे.
रेटींगनुसार १३ अंकांसहीत श्रीलंका सर्वांत वरच्या स्थानावर आहे. म्हणजेच श्रीलंका ही फायनलमध्ये दाखल होणारी पहिली टीम ठरणार आहे. तर पाकिस्तान ९ अंकांसहित दुसऱ्या स्थानावर आहे. या दरम्यान टीम इंडियानं ३ मॅचमध्ये ४ गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर जागा निश्चित केलीय.
कसं पोहचणार भारत `आशिया कप`च्या फायनलमध्ये...
फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला अफगाणिस्तानला बोनस अंकांसहित हरवणं भाग असेल. तसंच सध्या सुरू असलेल्या बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये बांग्लादेश मिसबाह उल हकच्या टीमला धोबीपछाड देईल. या स्थितीत भारत आणि पाकिस्तान ९ अंकांसहित रेटींगमध्ये बरोबरी करू शकतील. त्यामुळे फायनलमध्ये जाणाऱ्या टीमचा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.