www.24taas.com,झी मीडिया, बुलावायो
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेला सलग चार सामन्यांत पराभूत करून आता टीम इंडिया त्यांना ‘क्लीन स्वीप’ देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा पाचवा सामना दुपारी १२ वाजता सुरू होईल.
कर्णधार विराट कोहलीने घेतलेले निर्णय संघासाठी फायदेशीर ठरले आहेत. या स्पर्धेत रोहित, रैनाच्या धावा होत नव्हत्या. विराटने त्यांना गेल्या लढतीत आणखी एक संधी दिली. अर्धशतक झळकवून कर्णधाराचा त्यांच्यावरील विश्वािस त्यांनी सार्थ ठरवला. ‘फ्लॉप’ विनयकुमारला वगळून कर्णधाराने मोहित शर्माला संधी दिली. त्याने ‘सामनावीर’ बनून कर्णधाराने त्याची केलेली निवड योग्य ठरवली.
शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा आणि कर्णधार विराट कोहली अशी बॅटींग लाईन आहे. तर जयदेव उनाडकर, मोहित शर्मा, मोहम्मद शर्मा, जाडेजा लेगस्पिनर अमित मिश्रा असे तगडे बॉलर असल्यामुळे झिम्बाब्वेला ‘क्लीन स्वीप’ देणे शक्य आहे.
दरम्यान, झिम्बाब्वेचे प्रशिक्षक या दौर्याझपूर्वी म्हणाले होते, आम्ही पाचपैकी एक सामना तरी नक्की जिंकू, परंतु विराटचा संघ सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे झिम्बाब्वेचा सफाया होईल, अशीच शक्यता आहे. मात्र, झिम्बाब्वेकडे चांगले खेळाडू आहेत. ते चांगलीच टक्कर देण्यासाठी मैदानात उतरतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.