दिल्ली मेट्रोच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमींसाठी भाड्यानं

दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 18, 2013, 12:30 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.
झी मीडियाचा रिपोर्टर या कर्मचाऱ्याकडे एक ग्राहक म्हणून गेला. त्यानं तिथं विचारलं की खोली भाड्यानं मिळेल का? सोबत मैत्रिण असल्याचंही सांगितलं. तर कर्माचाऱ्यानं एका तासाचे ५०० रुपये सांगितले. अशाचप्रकारे येणाऱ्या प्रेमी युगुलांकडून हे मेट्रोचे कर्मचारी तासाचे ३०० ते ५०० रुपये आकारत असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट झालं.
झी मीडियाच्या या स्टिंग ऑपरेशननंतर `डीएमआरसी`मध्ये खळबळ माजली आहे. डीएमआरसीनं झी मीडियाकडे स्टिंग ऑपरेशनची सीडी देण्याची विनंती केली. त्यानंतर ही सीडी सोपवण्यात आली. तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. जर या सीडीतील दृश्य खरं आहेत असं सिद्ध झालं तर संबंधीत कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन डीएमआरसीनं दिलंय. या प्रकरणाची चौकशी मुख्य सुरक्षा आयुक्तांकडं सोपवण्यात आली आहे.
महत्वाची बाब म्हणजे या खोल्यांची आणि टॉयलेटची जबाबदारी खासगी कंपन्यांकडं देण्यात आली आहे. त्यामुळं कुणी दोषी आढळल्यास कंपनीवर देखील डीएमआरसी कारवाई करणार अथवा संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यास सांगणार, असं डीएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
झी मीडियाच्या क्राईम टीमला ही माहिती मिळाली असता सुरुवातीला त्यावर विश्वास बसला नव्हता म्हणून टीमनं स्वत: स्टिंग ऑपरेशन करण्याचं ठरवलं. हे स्टिंग ऑपरेशन राजधानी पार्क मेट्रो स्टेशनवर केलं गेलं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा `उद्योग` १५ मेट्रोस्टेशनवर सुरू आहे. यामध्ये रेस कोर्स, ग्रीन पार्क, जोर बाग आणि अशोक पार्क मेन अशा महत्वाच्या स्टेशनचा देखील समावेश आहे.

दिल्लीची शान दिल्ली मेट्रो असं मानलं जातं. देशातली पहिली आणि अत्याधुनिक अशी मेट्रो सेवा दिल्लीतल्या प्रवासासाठी सुरक्षित मानली जाते. या प्रकरणामुळं मेट्रो स्टेशनच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुन्हा चर्चेत आला आहे. अशा गोष्टींचा गैरफायदा दहशतवादी संघटना सहज घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षेच्यामध्ये असे गोरखधंदे इथं होत असल्याचं झी मीडियानं उघड केलाय. आता हे मेट्रो स्टेशन कपल्ससाठी डेटींग आणि शारिरिक संबंधांचा एक अड्डाच बनलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.