विदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 9, 2014, 08:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.
राज्यातल्या मतदानाचा हा पहिलाच टप्पा असल्यामुळे या टप्प्याकडे सर्वाधिक लक्ष लागून राहीलं आहे. नागपूरमध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची लढत प्रतिष्ठेची आहे. तसंच भंडा-यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचंही भवितव्य व्होटींग मशिनमध्ये बंद होईल. यवतमाळ वाशिममधून काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
विदर्भातल्या निवडणूक प्रचार आज थंडावलाय. दुपारी नेतेमंडळी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेताना दिसत होती. अकोल्यातून यावेळी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र अकोल्यात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्यासह भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे हिदायत पटेल, आम आदमी पार्टीचे प्राध्यापक अजय हिंगणकर यांच्यासह इतर तीन उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा रिंगणात आहेत. तर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटातर्फे राजेंद्र गवई लोकसभेच्या रिंगणात आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.