लोकसभा : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 12, 2014, 08:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.
आज मतदान होत असलेल्या चौथ्या टप्प्यात गोव्यातील दोन, आसामच्या तीन तर सिक्कीम आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेसाठी मतदार राजा कौल देतोय. तिसऱ्या टप्प्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळं पुढच्या टप्प्यांमध्येही मतदारांकडून असाच भरघोस प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.
उत्तर गोवा मतदारसंघात बहुरंगी लढत असली तर खरी चुरस भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच आहे. भाजपाकडून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री रवी नाईक रिंगणात आहेत. आपचे दत्ताराम देसाई आणि अपक्ष दयानंद नार्वेकर हे मते खातील पण त्यांचा फार परिणाम दिसणार नाही असा अंदाज आहे.
श्रीपाद नाईक तीन वेळा खासदार होते. तर रवी नाईक माजी मुख्यमंत्री आहेत. तर दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि काँग्रेसचे उमेदवार अलिक्सो ल्युरोन्को यांच्यात लढत आहे.
गोव्यातील निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रचारात नरेंद्र मोंदींची मोठी मदत झाली नाही. प्रचाराची धुरा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या खांद्यावरच होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.