www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई,
देशभरातल्या मोदी लाटेत महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची वाताहत झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालीय.
राज्यात काँग्रेसचे 82 आमदार असून यातील तब्बल 67 आमदारांच्या मतदारसंघात आघाडीचे लोकसभेचे उमेदवार पिछाडीवर आहेत.तर राष्ट्रवादीच्या 62 आमदारांपैकी 46 आमदारांच्या मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांची पिछाडीवर आहेत.
राज्यातील 28 मंत्र्यांच्या विधानसभा मतदारंसघातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदावारांची पिछाडी झाली आहे. यात नारायण राणे, छगन भुजबळ, पतंगराव कदम, गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गज मंत्र्यांचाही समावेश आहे. तर अनेक दिग्गज आमदारांच्या मतदारसंघातही आघाडी पिछाडीवर आहे...
- राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी 245 मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची आघाडी
- काँग्रेसच्या १४ मंत्र्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या १४ मंत्र्यांच्या मतदारसंघात पिछाडी
- काँग्रेसच्या 82 आमदारांपैकी 67 मतदारसंघात महायुतीची आघाडी – काँग्रेसच्या 15 आमदारांच्या मतदारसंघात केवळ आघाडी
- राष्ट्रवादीच्या 62 आमदारांपैकी 46 ठिकाणी महायुतीची मुसंडी – राष्ट्रवादीच्या 16 आमदारांच्या मतदारसंघात केवळ आघाडी
काँग्रेस नेत्यांच्या मतदार संघातील पिछाडी
१) नारायण राणे , कुडाळ, 21883
२) पतंगराव कदम , पलुस-कडेगाव , 24827
३) बाळासाहेब थोरात , संगमनेर, 22454
४) राधाकृष्ण विखे-पाटील , शिर्डी, 9522
५) पद्माकर वळवी , शहादा, 14645
६) नितीन राऊत , नागपूर उत्तर, 18540
७) नसिम खान , चांदिवली, 31933
८) सुरेश शेट्टी , अंधेरी पूर्व, 29590
९) वर्षा गायकवाड, धारावी, 2729
१०) संजय देवतळे , वरोरा, 27389
११) शिवाजीराव मोघे , आर्णी, 59814
१२) मधुकरराव चव्हाण , तुळजापूर, 34588
१३) रणजित कांबळे , देवळी, 30526
१४) राजेंद्र गावित , पालघर, 72535
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या मतदार संघातील पिछाडी
१) छगन भुजबळ, येवला, 53013
२) आर. आर. पाटील , तासगाव , 38129
३) जयंत पाटील , इस्लामपूर , 23445
४) गणेश नाईक , बेलापूर , 25784
५) अनिल देशमुख , काटोल , 38446
६) राजेश टोपे , घनसावंगी , 26388
७) जयदत्त क्षीरसागर, बीड, 3855
८) सचिन अहिर , वरळी , 34743
९) मधुकर पिचड , अकोले , 4590
१०) दिलीप सोपल , बार्शी, 55091
११) हसन मुश्रीफ , कागल, 9146
१२) संजय सावकारे, भुसावळ, 55708
१३) सुरेश धस , आष्टी , 8366
१४) उदय सामंत , रत्नागिरी, 31565
दिलीप वळसे पाटील, विधानसभा अध्यक्ष, आंबेगाव, 18583
वसंत पुरके, विधानसभा उपाध्यक्ष , राळेगाव, 27055
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.