www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद झालं.
राज्यात सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सरासरी ६१.८०% मतदान
* लातूर - ६२ टक्के
* बीड - ६४ टक्के
* नांदेड – ६३ टक्के
* हिंगोली – ६३ टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ६० टक्के
* उस्मानाबाद – ६५ टक्के
* परभणी – ६२ टक्के
* मावळ – ६३.१ टक्के
* पुणे – ५८.७५ टक्के
* बारामती – ५८.२ टक्के
* हातकणंगले - ७०.९० टक्के
* शिर्डी - ६१ टक्के
* कोल्हापूर - ६९.८० टक्के
* सोलापूर - ५७ टक्के
* शिरुर – ५९.५० टक्के
* अहमदनगर - ६० टक्के
* सांगली – ६५ टक्के
* माढा - ६२ टक्के
* सातारा – ५७ टक्के
१७६२ उमेदवारांचे भवितव्य EVM मशीनमध्ये बंद
देशभरातील १२१ जागांसाठी १७६२ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद. महाराष्ट्रात १९ जागांसाठी मतदान संपले. एकूण ३५८ उमेदवार रिंगणात.
देशात आज पाचव्या टप्प्याचं तर राज्यातलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं आहे. राज्यात सरासरी पाचपर्यंत 54 टक्के मतदान झालं आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढलीय.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने मतदानावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येतंय. लातूर जिल्ह्यात दुपारी पाचनंतर अवकाळी पाऊस बरसलाय. देशभरातील 121 मतदारसंघात हे मतदान शांततेत पार पडलं.
राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी अशी आहे, शिर्डीत ५४.६० %, बारामतीत ५०.४४ %, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ५३.६३%, नांदेडात ५५.३०%, शिरुर ५३%, सांगली ५६.९१% आणि पुणे ५१.२०% मतदान झालं आहे.
या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रात 12 तर मराठवाड्यात आठ तसेच कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदान पार पडलं आहे.
सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानाची स्थिती
* लातूर - ५८ टक्के
* बीड - ५५ टक्के
* नांदेड – ५५.०३ टक्के
* हिंगोली – ५२.२ टक्के
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५३.६३ टक्के
* उस्मानाबाद – ५५.६१ टक्के
* परभणी – ४८.१८ टक्के
* मावळ – ५०.६५ टक्के
* पुणे – ५१.३२ टक्के
* बारामती – ५०.४४ टक्के
* हातकणंगले - ५९ टक्के
* शिर्डी - ५४ टक्के
* कोल्हापूर - ५८ टक्के
* सोलापूर - ४९ टक्के
* शिरुर - ५३ टक्के
* अहमदनगर - ५५ टक्के
* सांगली – ५६.९१ टक्के
* माढा - ५२ टक्के
* सातारा – ५०.३२ टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
उद्योगमंत्री नारायण राणेंनी त्यांच्या कुटुंबीयांनी कणकवलीत त्यांच्या वरवडे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे बंडोखोर नेते दीपक केसरकरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी मतदान करून सिंधुदुर्गातला दहशतवाद संपवावा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय.
लातूर
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी बाभळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी विलासरावांच्या समाधीचं दर्शन घेतलं. विलासरावांच्या पत्नी वैशालीताई, लातूरचे आमदार अमित देशमुख, अभिनेता रितेश, धीरज देशमुख, विलासरावांचे धाकटे बंधू दिलीप देशमुख हे यावेळी हजर होते. लातूरचे काँग्रेस उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्या प्रचारासाठी देशमुख कुटुंबानं बरंच काम केलं होतं.
लातूरमध्ये मतदानाला पावसाचा अडथळा...
लातूरमध्ये ऐन मतदान सुरू असतानाच गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे काही ठिकाणी मतदानावर परिणाम झालाय. अचानक पाऊस आल्यानं मतदारांची प्रचंड तारांबळ उडाली.... तसंच काही मतदानकेंद्रांच्या मंडपांचंही नुकसाना झालं. काही ठिकाणी चक्क खुर्च्याही उडून गेल्या. पावसामुळे सखल भागांत पाणी साचलंय. रेणापूर, चाकूर, निलंगा आणि औसा तालुक्यात हा अवकाळी पाऊस झालाय.
शिर्डी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मतदान केलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि प्रवरानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदान केलं.
पुणे