www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची संपत्ती पंधरवाड्यात 14 लाखांनी वाढली आहे. बडोदा, वाराणसीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आवढलेला आकडा दिसून आलाय.
नरेंद्र मोदींच्या संपत्तीमध्ये पंधरा दिवसांमध्ये 14 लाखांची वाढ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नरेंद्र मोदींनी बडोदा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेपेक्षा त्यांच्या मालमत्तेत आता 14.34 लाखांची वाढ झालीय. वाराणसीमध्ये काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी त्यांची मालमत्ता 1 कोटी 65 लाख रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय.
मात्र याबाबत भाजपने खुलासा केलाय. निवडणूक खात्यास रक्कम वळवल्यानं मालमत्तेत वाढ झाल्याचे भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे. मोदी यांच्यासाठी वाढलेला निधी पक्षाकडून देण्यात आल्याचं भाजपनं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.