मुंबई : पुरुष वर्ग हा अधिक वेळ धावपळीत घालवतो. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. पुरुषांनी खाली दिलेल्या या गोष्टी कराव्यात.
१. आरोग्यासाठी समतोल असा आहार घ्यावा.
२. नियमित व्यायाम करा. आठवड्यातून किमान ३ वेळा तरी कराच.
३. थोडावेळ स्वत:साठी खर्च करा.
४. विचारांची देवाणघेवाण करा.
५. तुम्हाला रडावसं वाटलं तर अवश्य रडा ते आरोग्यासाठी चांगलं असतं.
६. रोज किमान ८ तास झोप घ्या.
७. आरोग्याच्या प्रश्नाविषयी माहिती करून घ्या.
८. तुमचे वय ४० पेक्षा कमी असेल तर वर्षातून किमान एकदा आरोग्याची तपासणी करून घ्या.
९. ध्यानधारणा करा. ज्यामुळे मन आणि शरीरासाठी उत्तम राहील.
१०. अधिक प्रमाणात व्यसन करणं टाळा. हळूहळू व्यसन संपूर्ण सोडून द्या. कारण त्रास तुम्हालाच होणार आहे.