मुंबई : काळ्या केसांत एखादा पांढरा केस दिसल्यास अनेकांना तो उपटण्याची सवय असते. मात्र ही सवय अधिक हानिकारक आहे.
जेव्हा तुम्ही भुवयांचा अथवा डोक्यातील एखादा पांढरा केस उपटता तेव्हा तेथे जखम होते. यामुळे केसांची वाढ नीट होत नाही. त्या केसाच्या जागी आलेले तुमचे केस कमकुवत होतात. जर तुम्ही वारंवार केस उपटत असाल तर तुमचे केस कमकुवत होतील.
त्यामुळे एखादा पांढरा केस तुम्हाला दिसल्यास तो उपटू नका. त्याउलट जमल्यास अशा केसांना डाय करा.