पान आणि कामजीवन

यौन शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय नेहमी समोर येतात. आयुर्वेदानुसार पान यौन शक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे. पानाचा वापर लोक माऊथ फ्रेशनर किंवा पचन क्रिया चांगली होण्यासाठी करतात. पूर्वी रात्री पतीला पान खाऊ घालण्याची प्रथा होती. 

Updated: Nov 12, 2015, 04:41 PM IST
पान आणि कामजीवन  title=

मुंबई : यौन शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय नेहमी समोर येतात. आयुर्वेदानुसार पान यौन शक्ती वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे. पानाचा वापर लोक माऊथ फ्रेशनर किंवा पचन क्रिया चांगली होण्यासाठी करतात. पूर्वी रात्री पतीला पान खाऊ घालण्याची प्रथा होती. 

तुमच्या काम जीवनाला अधिक चांगले बनिवण्यासाठी पानाचा उपयोग होऊ शकतो. पान बनविताना त्यात सुपारी हे कामोत्तेजकाचे काम करते. पानात सुपारी, लवंग आणि गुलकंद टाकला जातो. याने पचनशक्ती वाढते आणि कामोत्तेजना जागृत होते. तसेच पान हे प्रजनन क्षमतेला अधिक चांगल बनवतो. 

पान खाण्याचा सर्वात चांगला प्रकार म्हणजे पानाला संपूर्ण चाऊन घ्या आणि तोंडाच्या एका कोपऱ्यात ठेऊन द्या. ते तोंडात विरघळत नाही तोपर्यंत ते चावत राहा. पान खाल्यानंतर पुढील अर्धा तास काहीच खाऊ नका. 

जाणकारांच्या मते पान शरिरातील इतर द्रव्यात मिक्स झाल्यावर चांगली शक्ती प्रदान करते. यौन शक्ती वाढविण्यासाठी रात्री जेवल्यावर एकदाच पान खाणे चांगले असते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.