वॉशिंग्टन: लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय.
संशोधनात माहिती मिळालीय की, लहानपणी व्हिटॅमिन डीची पुरेशी मात्रा न मिळाल्यानं 25 वर्षानंतर प्रौढावस्थेत ही कमी सबक्लिनिकल अॅथेरोस्क्लेरोसिसच्या रूपात समोर येते. अॅथेरोस्क्लेरोसिसचा सरळ संबंध हृदयाच्या रोगांशी आहे आणि हे हृदयाच्या कामावर परिणाम करतात.
फिनलँडची युनिव्हर्सिटी ऑफ टुरकुचे मारकुस जुओनालानं सांगितलं की, आमच्या शोधाच्या परिणामानुसार लहानपणी व्हिटॅमिन डीची कमी आणि प्रौढावस्थामध्ये सबक्लिनिकल अॅथेरोस्क्लेरोसिसची समस्येमध्ये संबंध दिसला. संशोधकांनी आपल्या संशोधनात पहिले तीन ते 18 वर्ष वयोगटातील 2,148 जणांचा अभ्यास केला आणि याच व्यक्तींचा 30 ते 45च्या वयात पुन्हा अभ्यास केला. अभ्यासात निष्कर्ष निघाला ज्या मुलांना लहानपणी भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळालं नाही, त्यांना प्रौढावस्थेत अॅथेरोस्क्लेरोसिससाठी जबाबदार ठरणाऱ्या कॅरोटिड इंटिमा-थिकनेस (आयएमटी) अर्थात हृदयाच्या आजारांची शक्यक्ता अपेक्षेपेक्षा जास्त होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.