नवी दिल्ली: ट्रायचे माजी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव म्हणून नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झालाय. कारण आज ट्राय संशोधन विधेयकाला राज्यसभेतही मंजूरी मिळालीय. लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर या विधेयकाला आज राज्यसभेतही मंजूरी मिळाली.
काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, माकप आणि आम आदमी पक्षानं वॉकआऊट करून लोकसभेत सोमवारी ट्राय संशोधन विधेयकाला मंजूरी दिली. अध्यादेश काढून आणल्या गेलेल्या ट्राय संशोधन विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांनी हे स्पष्ट केलंय की ते संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर कोणतीही शंका उपस्थित करत नाहीयेत.
कायदा व सूचना आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. विरोधकांनी लावलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचं म्हणत सरकार संसदेच्या प्रतिमेला आणि सर्वोच्चपदाला नजरअंदाज करत नाही आहोत.
हे विधेयक लोकसभेत मंजूर होणारच होतं, मात्र ते राज्यसभेतही न अडकता आणि पास झालंय. त्यामुळं आता मिश्रा हे पंतप्रधानांचे नवे मुख्य सचिव असतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.