अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचा एक कार्यकर्ता आणि पंजाब पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, गँगस्टर समजून पोलिसांनी या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता.
शहराच्या जवळच्याच मुधल गावानजिक वेरका भागात मंगळवारी रात्री साध्या कपड्यांमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीत असलेल्या मुखजीत सिंह याला थांबण्याचा इशारा केला होता. परंतु, त्यानं थांबण्याऐवजी पोलीसांवरच गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुखजीतचा मृत्यू झाला.
हत्या आणि दरोड्यांच्या प्रकरणात 'वॉन्टेड' असलेला जग्गू या गाडीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे, शिअदच्या अध्यक्षाच्या गाडीत आलेल्या या व्यक्तीनं गाडी न थांबविल्यानं पोलिसांचा संशय वाढला... त्यांना गाडीत जग्गूच असल्याचं वाटलं आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या.
सिंह यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची तसंच त्यांना कामावरून कमी करण्याची मागणी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.