विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ

तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.

PTI | Updated: Nov 3, 2015, 09:52 AM IST
विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ title=

नवी दिल्ली: तेल कंपन्यांनी व्यावसायिक आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलीय. कमर्शियल सिलेंजरच्या किमतीत ५० रुपये आणि सब्सिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत २७.५० रुपयांनी वाढ झालीय.

त्यामुळं आता १४.२ किलो वजन असलेलं विना सब्सिडी सिलेंडर ५०६ रुपयांवरून वाढून ५३३.५० रुपयांना मिळेल. तर १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरची किंमत १०५६.५० रुपयांवरून ११०६.५० रुपये इतकी झालीय. 

दरम्यान, विमान कंपन्यांच्या इंधनाची किंमत कमी करण्यात आलीय. मात्र याचा विमान प्रवासी भाड्यावर किती परिणाम होईल, हे विमान कंपन्यांनी स्पष्ट केलेलं नाही. 

यापूर्वी १ ऑक्टोबरला विना सब्सिडी सिलेंडरच्या किमतीत ४२ रुपयांची कपात करण्यात आली होती. पण आता ही किंमत वाढवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.