नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या विरेंद्र सिंग यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.
४३ उमेदवारांमध्ये सात महिला आणि ११ तरुण उमेदवारांना निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये अंबाला कॅटमधून भाजपचे प्रदेश सचिव अनिल विज, उछनाकलातून विरेंद्र सिंग यांची पत्नी प्रेमलता सिंग, बादलीमधून भाजपच्या किसान मोर्चाचे प्रमुख ओपी धनकड, पंचकुलातून ज्ञानचंद्र गुप्ता यांच्या नावाचा समावेश आहे.
पहिल्या यादीत हरियाणाचे माजी मंत्री जगदीश नेहरा (रानिया), कृष्णा गहलावत (राय), छतरपाल सिंग (हांसी) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. रोहतकमधून भाजपचे युवा नेता कॅप्टन अभिमन्यू नारनौंद तर भाजप हरियाणा इकाईप्रमुख राम विलास शर्मा महेंद्रगढमधून निवडणूक लढतील, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.