नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालीये. या भागातील थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढायला लागला असून शनिवारची रात्र कूल नाईट ठरली. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेहमध्ये उणे १२ अंश सेल्सियसहून कमी तापमानाची नोंद झाली.
राजधानी दिल्लीत किमान तापमान ६.८ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. शनिवारची रात्रे लेहमधील सर्वाधिक थंडीची रात्र ठरली. तेथे तापमानाचा पारा उणे १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरला होता. श्रीनगरमध्येही ०.८ अंश सेल्सियसची नोंद झाली.
दिल्लीसह हरियाणा आण पंजाब राज्यातही थंडीचा कडाका वाढायला लागलाय. लखनऊ, वाराणसी आणि इलाहाबादमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका अधिकच वाढणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.