काश्मीर गोठलं... विदर्भातही थंडीची लाट

काश्मीर खोरं बर्फवृष्टीनं गोठलंय. श्रीनगरपासून गुलमर्ग सोनमर्ग पहलगाम परिसरात तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली. श्रीननगर ते जम्मूला जोडणारा नॅशनल हायवे क्र.1 दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आलाय.

Updated: Feb 2, 2015, 11:14 PM IST
काश्मीर गोठलं... विदर्भातही थंडीची लाट title=

नवी दिल्ली : काश्मीर खोरं बर्फवृष्टीनं गोठलंय. श्रीनगरपासून गुलमर्ग सोनमर्ग पहलगाम परिसरात तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली. श्रीननगर ते जम्मूला जोडणारा नॅशनल हायवे क्र.1 दुसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आलाय.

हिमाचल, कुल्लू, मनाली आणि किन्नोर परिसरातही बर्फवृष्टी सुरूच आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडात 3 फेब्रुवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. तीनही
राज्यात अलर्ट जारी करण्यात आला असून 2,500 मीटरपेक्षा जास्त उंचावर राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भालाही थंडीची लाट... 

उल्लेखनीय म्हणजे, जम्मू आणि काश्मीर मध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे विदर्भात थंडीची लाट आलीय. विदर्भात सर्वात कमी म्हणडे 7.7 इतकं तापमान नागपूर मध्ये नोंदवण्यात आलं आहे.  

उत्तर भारतात हिमवृष्टी होत असल्याने तापमानात घट झाली असल्याचे नागपूर हवामान खात्याने सांगितले आहे. या आधी 12 फेब्रुवारी 1950 मध्ये 5.0 तापमानाची नोंद करण्यात आली होती.

अचानक तापमानात बदल झाल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर त्याचा प्रभाव  दिसून येतो आहे. सर्दी,खोकला, तापासारख्या आजाराच्या रुग्णांमध्ये 50% ने वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा वातावरणामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.