उदमपूर : जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूरमध्ये कासिम हा जिवंत अतिरेकी पकडण्यात आला आहे. कासिम या दहशतवाद्याने मोठी कबुली दिली आहे. पुँछ जवळ सिमा ओलांडून, तो पाकिस्तानातून भारतात आला आहे. यातील एका अतिरेक्याला बीएसएफने ठार मारलंय.
बारा दिवसांपासून तो पाकिस्तानातून भारतात आला आहे, जम्मूमध्ये एका स्लिपर सेलने त्याला हत्यारं देखील पुरवली होती. अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आपल्याला पाठवण्यात आलं असल्याचं कासिमने सांगितलं.
कासिमने तीन जणांना ओलिस ठेवलं होतं, पण ज्यांना ओलिस ठेवलं होतं, त्या तीन जणांनीच त्याला पकडलं. कासिम आपली वक्तव्य पुन्हा-पुन्हा बदलतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.