नवी दिल्ली : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर फोडण्यात आलंय. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत झालेल्या चिंतन बैठकीत काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर टीकेची तोफ डागली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारचा कारभार असाच राहिला तर आगामी विधानसभा निवडणुकीतही तेच चित्र दिसेल, असा धोक्याचा इशारा नेत्यांनी यावेळी दिल्याचं समजतं. ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांच्या उपस्थितीत ही चिंतन बैठक पार पडली. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते.
जे नेते संघनेवर खापर फोडत आहेत ते स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेर पडले नाहीत आणि निवडणुकीही जिंकू शकले नाहीत, त्यांचे योगदान काय ? असा सवाल माणिकराव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. काँग्रेसच्या या बैठकीत माणिकरावांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी कामाची यादी सादर करत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी काही मुद्दे मांडून आपला बचाव केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.