नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मात्र, मोहन भागवत यांनी केलेली ‘हिंदू’च्या व्याख्येनं मात्र नवा वाद निर्माण झालाय.
‘अमेरिकेत राहणारा अमेरिकन, जर्मनीत राहणारा जर्मन तर हिंदुस्थानात राहणारा हिंदू का नाही?’ असा सवाल भागवत यांनी उपस्थित केलाय. हिंदुत्व ही सर्व भारतीयांची सांस्कृतिक ओळख आहे, असंही भागवत यांनी म्हटलंय.
मोहन भागवत यांच्या यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं मात्र जोरदार टीका केलीय. भारत एक बहुसांस्कृतिक आणि बहु धार्मिक समाज आहे. याच समाजानं संघाचे विचारवंत एम एस गोलवलकर यांची ‘हिंदुत्वा’ची व्याख्यादेखील स्वीकार केली नव्हती, असं काँग्रेसनं म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही शुद्धिकरणाबाबत ऐकतोय. महिलांनी काय परिधान करायला हवं? आणि नवा इतिहास लिहिण्यासंबंधी ही चर्चा सुरु आहे. हा चिंतेचा विषय आहे, असंदेखील काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटलंय.
यापूर्वी, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी भागवत यांना संविधानाचा अभ्यास करण्याच सल्ला दिलाय. संविधानत स्पष्टपणे उल्लेख केलाय की, इंडिया भारत आहे, राज्यांचा संघ आहे आणि इथं मात्र भारताचा ‘हिंदुस्थान’ असा उल्लेख केला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.