मुंबई : नोटबंदीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादा आरबीआय फेब्रुवारी अखेरपर्यंत हटवण्याची चिन्हं आहेत.
सध्या एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येतात, तर आठवड्याला फक्त 24 हजारांपर्यंतच पैसे काढता येत आहेत.
नोटबंदीनंतर बाजारात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. पण या महिन्याभरात चलनाचा तुटवडा संपेल आणि परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत पैसे काढण्याच्या सगळ्या मर्यादा रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.