नवी दिल्ली : सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा नथूराम गोडसे होता. पण नथूरामला हत्या केल्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी धाडसाने पकडणारा कोण होता? याबद्दल अनेकांना माहीत नसेल.
महात्मा गांधी यांना त्याला वाचवता आले नाही म्हणून कोणी नथूरामला पकडणाऱ्याची आठवण काढत नाही.
रघू नायक असे या व्यक्तीचे नाव असून तो दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये माळ्याचे काम करत होता. नथूरामने गोळ्या घातल्यावर नथूराम पळ काढत होता. त्यावेळी त्याचा पाठलाग करून त्याला धरले आणि त्याला ताब्यात घेतले. नथूरामला नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.
नायक मूळचा ओडिसामधल्या केंद्रपरा जिल्ह्यातील जगुलाईपाडाचा रहिवासी... त्यांना तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडून ५०० रुपयांचं बक्षीस देण्यास आलं होतं. १९८३ साली नायक यांनी अखेरचा श्वास घेतला.
या खऱ्याखुऱ्या हिरोला मानवंदना देऊन ओडिशा सरकारनं बुधवारी नायक यांच्या पत्नी मंदोदरी नायक (८५ वर्षीय) यांच्याकडे पाच लाखांचा चेक सुपूर्द केला.
जगुलाईपाडाच्या नागरिकांनी नायक यांच्या स्मरणार्थ २००५ साली एक स्मारकही उभारलंय.