देहरादून : उत्तराखंडमध्ये पोलिसांच्या घोड्याला केलेल्या मारहाणीप्रकरणी भाजप आमदार गणेश जोशी यांना अटक करण्यात आलीय.
एका आंदोलना दरम्यान गणेश जोशी यांनी पोलिसांचा घोडा शक्तिमान याला मारहाण केली होती. या मारहाणीत त्या घोड्याच्या पायाला दुखापत झाली होती.
घोड्याच्या तुटलेल्या पायाचा रक्तप्रवाह खुंटला होता. पायाला गँगरीन झालं. त्याचा संसर्ग शरीरात होऊ नये, यासाछी अखेर शक्तिमानचा पाय कापावा लागला.
दरम्यान, शक्तिमानला नवा कृत्रिम पाय लावण्यात येणार आहे. पण तरीही तो भविष्यात धावू शकेल, याची शक्यता कमी आहे.