मेरठ: माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
ओवेसी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये असंख्य मुस्लिम रस्त्यावर उतरले आणि ओवेसींच्या या वक्तव्याचा निषेध केला.
मेरठच्या रस्त्यावर उतरुन या नागरिकांनी 'भारत माता की जय'चे नारे दिले. तसंच आपल्या रक्तानं 'भारत माता की जय' लिहीलं. आम्ही देशासाठी काहीही करू शकतो, आणि ओवेसींच्या या वक्तव्याचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी दिली.