www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एलपीजी सिलेंडर्सचं अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केली आहे.
आता या आधी मिळत होते त्याप्रमाणे, सवलतीच्या दरात म्हणजे 430 ते 450 रुपयात सिलिंडर घरपोच मिळणार आहे.
एलपीजी सिलेंडर्स वितरणातील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी, थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्याची योजनेला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
योजनेला तूर्तास ब्रेक लावल्याने यापूर्वी मिळत होता, त्याप्रमाणे ४५० रूपयांना तुम्हाला तुमचा सिलिंडर घरपोच मिळणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीविषयी अनेक तक्रारी होत्या, हा तक्रारी नेमक्या काय आहेत. ग्राहकांना याचा नाहक कोणताही त्रास होणार नाही, यासाठी काय करावं लागेल, यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.
या समितीकडून या योजनेत येणाऱ्या अडचणींची सध्या चाचपणी सुरू आहे.
जोपर्यंत या अंमलबजावणीत त्रुटी आहेत, तोपर्यंत आधारशी जोडलेली ही योजना थांबवण्यात आली आहे, खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी ही घोषणा केली आहे.
सुरूवातीला देशातील १८ राज्यांमधील २८९ जिल्ह्यांमध्ये, सिलिंडरचे अनुदान आधार कार्डच्या सहाय्याने थेट खात्यावर जमा करण्याची योजना सुरू झाली होती. मात्र आता थेट जुन्या पद्धतीने तुम्हाला सिलिंडर मिळणार आहे.
आपली सबसिडीची रक्कम खात्यावर येत नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या, आता जास्त घोळ व्हायला नको, म्हणून ही योजना तूर्तास बाजूला टाकण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.