नवी दिल्ली : भारतात लवकरच नव्या हायस्पीड इंटरनेट युगाची सुरुवात होणार आहे. कारण इस्रोनं पुढील १८ महिन्यांत तीन उपग्रह अंतराळ सोडण्याचं मिशन आखलंय. पहिलं कम्युनिकेश सॅटेलाईट म्हणजे जी-सॅट 19 हे जून महिन्यातच अंतराळात पाठवलं जाईल. त्यानंतर जी-सॅट 11 आणि जी-सॅट 20 प्रक्षेपित करण्यात येईल.
या उपग्रहाच्या लॉन्चिंगमुळे भारतातील इंटरनेटचा स्पीड कमालीचा वाढणार आहे.. या वर्षाच्या अखेरपर्यंत जी-सॅट 11 हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. या माध्यमातून 13 गिगाबाईट डेटा प्रति सेकंद ट्रान्सफर करणं शक्य होऊ शकेल. तर 2018च्या अखेरपर्यंत जी-सॅट 20 अंतराळात सोडण्यात येईल. त्याद्वारे 60 ते 70 गीगाबाईट प्रति सेंकद एवढा डेटा स्पीड मिळेल.