नवी दिल्ली: प्रसिद्ध इतिहासकार बिपीन चंद्रा यांचे शनिवारी सकाळी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते.
त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या चंद्रा यांचं गुडगाव इथल्या निवासस्थानी सकाळी सहाच्या सुमारास निधन झालं. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रा हे आधुनिक भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासातील तज्ज्ञ होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं खास योगदान होतं. त्यांनी 'आधुनिक भारताचा इतिहास', 'भारताचा स्वातंत्र्य संघर्ष', अशी अनेक प्रसिद्ध पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.