काजरी नुरपूर, उत्तर प्रदेश: लहान मुलांना माती खातांना आपण अनेकदा पाहतो. मात्र 90 वर्षाच्या आजी दररोज तब्बल 1 किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.
उत्तर प्रदेशच्या शाहजहां जिल्ह्यातील काजरी नुरपूर गावात राहणाऱ्या 92 वर्षीय सुदामा देवी यांच्याबद्दल बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सुदामा देवी आपल्या या मातीच्या खाण्याच्या छंदाबद्दल सांगतात, त्या 10 वर्षाच्या असतांना मैत्रिणींनी गमती-गमतीत माती खायला सांगितली. तेव्हापासून म्हणजे तब्बल 80 वर्षांपासून त्यांना माती खाण्याचा छंदच लागलाय.
दररोज 1 किलो माती खाऊन त्या ती पचवतात सुद्धा... कोरडी माती खाण्यापूर्वी त्या थो़डी माती एका ग्लासमध्ये पाण्यासोबत मिसळून पितात. याशिवाय संत्र्याला पण कोरडी माती लावून खातात.
सुदामा देवी आणि पती कृष्ण कुमार यांना एकूण 10 मुलं झाले. 7 मुलं आणि 3 मुली. मात्र त्यातील आता केवळ 3 मुलं आणि 1 मुलगी जिवंत आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे फिट सांगितलंय. स्वत: सुदामा देवीला पण आपल्या या छंदाचा त्रास नाहीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.