www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. गृह कर्ज आणि वाहन खरेदी कर्जावर लवकरच व्याजदर घटण्याची शक्यता आहे.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट कायम ठेवले असले तर गाडी आणि गृह कर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात होऊ शकते. कारण, सध्या हे दोन्ही क्षेत्र मंदी अनुभवत आहेत. रिअल इस्टेट कंपन्यांची सध्या थोडी कुचंबना सुरू आहे कारण मोठे मोठे व्याजदर पाहून ग्राहक घर खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.
रिझर्व्ह बँकनं कमर्शिअल बँकांना 10,000 करोड रुपये जाहीर केलेत. एका शॉर्ट टर्म लोनप्रमाणे हा प्रकार आहे. यामुळे बँकांकडे ना केवळ अतिरिक्त राशी उपलब्ध होईल पण त्यांना ही रक्कम अगदी कमी व्याजात उपलब्ध होणार आहे, त्यामुळेच बँकेच्या कर्जाच्या व्याज दरांमध्ये घट शक्य आहे.
आता बँकेचं लक्ष अर्थसंकल्पाकडे असणार आहे. त्यातील तरतूदी जाहीर झाल्यानंतर बँकेकडून व्याज दरांत घट शक्य आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.