जम्मू : एकीकडे स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या... त्याचवेळी सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय..
गेल्या २४ तासांत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सहा भारतीय नागरिक ठार, तर १५ जण जखमी झालेत.
जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमधील अनेक परिसरात पाकिस्तान लष्काराकडून गोळीबार करण्यात येतोय.. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात होणारा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा यामुळं स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झालंय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.