नवी दिल्ली : पंजबामध्ये 'आप'ची सत्ता आली तर अमृतसरला 'पवित्र शहर'चा दर्जा देऊ असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. केजरीवालांच्या या वक्तव्याचा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजूंनी खरपूस समाचार घेतला आहे.
केजरीवालांचं हे वक्तव्य म्हणजे राजकारणाची खालावलेली पातळी दाखवणारी आहे. केजरीवालांचा मेंदू रिकामा असल्याची टीकाही काटजूंनी केली आहे. केजरीवाल हे लोकांना चिथावणारे आणि थापा मारणारे नेते असल्याचंही काटजू म्हणाले आहेत.
अमृतसरला पवित्र शहराचा दर्जा दिला तर प्रयाग, वाराणसी, अयोध्या, मथुरा, अजमेर सारख्या शहरांनापण असा दर्जा देण्याची मागणी होईल. निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल, पण देशाच्या निधर्मी वातावरणावर याचा परिणाम होईल, अशी प्रतिक्रिया काटजूंनी फेसबूकवर दिली आहे.
ही आहे काटजूंची फेसबूक पोस्ट