नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.
NCRBच्या माहितीनुसार, देशात उत्तरप्रदेश आणि बिहार यांचा क्रमांक मुलींच्या अपहरणाच्या बाबतीत सर्वात वरचा आहे. यानंतर आसामचा नंबर लागतो.
उत्तरप्रदेशात गेल्या वर्षी ७,३३८ मुलींच्या अपहरण प्रकरणाची नोंद झाली होती. बिहारमध्ये ४,६४१ तर आसाममध्ये ३३८८ मुलींचं अपहरण झालं होतं, असं या आकड्यांवरून समोर येतंय.
पण, या अपहरणांमागच्या कारणांचा खुलासा करताना 'पैशांसाठी' ही किडनॅपिंगमागचं महत्त्वाचं कारण नसंत... तर यामागचं मुख्य कारण असतं 'लग्न'
गेल्यावर्षी झालेल्या ७७,००० किडनॅपिंगच्या प्रकरणांमध्ये केवळ ६७६ अपहरण खंडणीसाठी झाली होती. तर जवळपास ३१,००० मुलींचे अपहरण जबरदस्तीनं लग्नासाठी करण्यात आले होते.
या अहवालावर पोलिसांनी मात्र वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी स्वत:च्या मर्जीनं लग्न करण्यासाठी घरातून पळून जातात तेव्हा कुटुंबीय त्यांच्या अपहरणाचा गुन्हा पोलिसांत दाखल करतात. त्यामुळेच, लग्नासाठी झालेल्या अपहरणाचा आकडा मोठा दिसतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.