पतीला घातल्या होत्या ६५ गोळ्या, त्यांच्याविरोधात लढतेय ही महिला निवडणूक

मोहम्मदाबाद विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार अल्का राय एका अशा उमेदवाराच्या भावाविरोधात उभ्या आहेत ज्या महिलेवर भरदिवसा ७ लोकांसह पतीच्या हत्येचा आरोप आहे. अल्का राय माजी भाजप आमदार स्वर्गीय कृष्‍णानंद राय यांची पत्‍नी आहे.

Updated: Feb 8, 2017, 01:55 PM IST
पतीला घातल्या होत्या ६५ गोळ्या, त्यांच्याविरोधात लढतेय ही महिला निवडणूक title=

गाजीपूर : मोहम्मदाबाद विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार अल्का राय एका अशा उमेदवाराच्या भावाविरोधात उभ्या आहेत ज्या महिलेवर भरदिवसा ७ लोकांसह पतीच्या हत्येचा आरोप आहे. अल्का राय माजी भाजप आमदार स्वर्गीय कृष्‍णानंद राय यांची पत्‍नी आहे.

या निवडणुकीत त्यांचा सामना मुख्तारचा भाऊ आणि आमदार सिबगतुल्लाह अंसारीसोबत होणार आहे जो बीएसपी उमेदवार आहे. कृष्णनंद राय यांना ६५ गोळ्या मारल्या गेल्या होत्या.

पती के.एन राय यांच्या हत्‍येनंतर २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा अल्का राय यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सपाच्या गामा राम यांना 33,744 मतांनी हरवलं होतं. यानंतर २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना संधी मिळाली. पण 3,386 मतांनी सपाच्या सिबगतुल्लाह अंसारी यांच्या समोर पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये निवडणूक नाही लढवली.

भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा त्यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्या पतीची हत्या करणारा १२ वर्षापासून जेलमध्ये आहे. 29 नोव्हेंबर 2005 ला आमदार कृष्णानंद राय यांच्यासह ७ लोकांची हत्या करण्यात आली होती.