www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यपाल कमला बेनीवाल हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात या दोघांमध्ये आता मतभेद उघड झाले आहेत.
गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय रोखण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राज्यपाल कमला बेनीवाल यांनी केलाय. यापूर्वीच ‘गुजरात जनलोकपाल विधेयक २०१३’ विधानसभेमध्ये संमत झालंय. परंतु बेनीवाल यांनी गुजरात राज्यात लोकपालाच्या नियुक्ती करण्यासंदर्भात काही आक्षेप घेऊन हे विधेयक परत माघारी धाडलंय.
राज्य सरकारचे प्रवक्ते आणि वित्तमंत्री नितीन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी ‘गुजरात जनलोकपाल विधेयक २०१३’ ला आपली मंजूरी न देताच परत पाठवलंय. हेच विधेयक गेल्या एप्रिल महिन्यात विधासभेमध्ये पारित झालं होतं.
राज्यपाल कमला बेनीवाल यांनी या विधेयकाला पुन्हा एकदा समीक्षेसाठी सरकारकडे परत पाठवलंय. परंतु, राज्यपालांनी हे विधेयक कोणत्या आधारांवर सरकारला परत धाडलंय हे मात्र सांगणं पटेल यांनी टाळलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.