www.24taas.com,नवी दिल्ली
कोळसा खाण वाटपावरून वादात अडकलेले शालेयशिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा आणखी दोन दिवस लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. आपले पद वाचविण्यासाठी दर्डा यांची धडपड सुरू आहे.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात्येय. सोनिया गांधी पुढील आठवड्यात परदेशातून परत येणार असून त्यानंतर दर्डा यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल,असे काँग्रेसच्या सूत्रांकडून समजते.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींनी दर्डा यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. मात्र आपले मंत्रीपद वाचवण्यासाठी दर्डा यांची धडपड अद्याप सुरू आहे. पक्षश्रेष्ठींनी जरी राजीनामा देण्यास सांगितले असले तरी आपले मंत्रीपद वाचवण्यासाठी सोनिया गांधी परदेश दौऱ्यावरून येईपर्यंत दर्डा राजीनामा देणार नाहीत,असं सांगितलं जातय.
सोनिया गांधींची भेट घेऊन आपला राजीनामा टाळण्याचा दर्डा यांचा प्रयत्न असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे.
कोळसा घोटाळ्यात सीबीआयने गुन्हा दाखल केलेले शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे मंत्रीपद जाणार असे स्पष्ट संकेत काँग्रेसमधून मिळतायत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर्डा यांचा राजीनामा घेऊन सध्याच्या मंत्रीमंडळात काही फेरबदल करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. यात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळेल, तर काही नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसतील, अशी शक्यता आहे. या संभाव्य फेरबदलात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही बदल संभवतात.