चिमुरड्याच्या हातात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

तुमच्या मुलांच्या हातात खेळणं म्हणून मोबाईल ठेवण्याची सवय तुम्हालाही असेल तर आत्ताच सावध व्हा... कारण हाच मोबाईल तुमच्या चिमुरड्याच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. 

Updated: Apr 1, 2015, 09:10 AM IST
चिमुरड्याच्या हातात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : तुमच्या मुलांच्या हातात खेळणं म्हणून मोबाईल ठेवण्याची सवय तुम्हालाही असेल तर आत्ताच सावध व्हा... कारण हाच मोबाईल तुमच्या चिमुरड्याच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. 

पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये एक अशीच घटना घडलीय. मोबाईलशी खेळता खेळता एकाचं कुटुंबच उद्ध्वस्त झालंय. सात वर्षांचा चिमुरडा मोबाईल फोनशी खेळत होता... हा मोबाईल फोन चार्जिंगला लावलेला होता आणि तेवढ्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला....

या स्फोटानंतर लागलेल्या आगीत चिमुरड्याला गंभीर इजा झाली. मुलाच्या ओरडण्याचा आणि स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर घरातील व्यक्ती लगेचच बाहेर आल्या आणि त्यांनी पाणी टाकून आग विझवली. 

चिमुरड्याला तत्काळ हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं पण एव्हाना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.