रामराजे शिंदे, दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशना नोटबंदीमुळे पाण्यात गेलं. आता नवीन वर्षात अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे. मात्र, मागील अडीच वर्षात कोणत्या पक्षांच्या खासदारांनी सर्वात चांगली कामगिरी केली आणि कोणत्या खासदारांचा कामगिरी खराब राहिली, याचा हा आढावा...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संसदेत केलेल्या कामगिरीचा विचार केला तर, केवळ सुप्रिया सुळे आणि विजयसिंह मोहीते पाटील यांची कामगिरी चांगली राहिली आहे. उदयनराजे भोसले यांची संसदेतील कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. उदयनराजे यांची उपस्थिती काठावर पास होण्याइतपतही नाही. उदयनराजे भोसले यांनीच अॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. संसदेत मात्र आवाज काढला नसल्याचे दिसून आले.
उदयनराजे भोसले
३० टक्के उपस्थिती
चर्चेत सहभाग - ०
प्रश्न विचारले - ०
सुप्रिया सुळे
उपस्थिती - ९५ टक्के
५३ वेळा चर्चेत सहभाग
६८० प्रश्न विचारले
८ खाजगी विधेयक मांडले
धनंजय महाडिक
७९ टक्के उपस्थिती
२७ चर्चेच सहभाग घेतला
६७९ प्रश्न विचारले
महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोन्ही प्रदेशाध्यक्षांची कामगिरी निराशाजनक राहिलीय. या दोघांच्याही हातात महाराष्ट्राची जबाबदारी आहे. परंतु संसदेतील जबाबदारी पार पाडण्यात मात्र, अपयशी ठरले आहेत. त्याशिवाय संजयकाका पाटील आणि शरद बनसोडे यांनी सर्वात कमी वेळा चर्चेत सहभाग घेतला.
- ३ वेळा रावसाहेब दानवे यांनी चर्चेत सहभाग घेतला
- ६ वेळा शरद बनसोडे
- ७ वेळा अशोक चव्हाण आणि संजयकाका पाटील चर्चेत सहभाग घेतला
सुप्रीया सुळे - ६८०
श्रीरंग बारणे - ६७२
शिवाजीराव आढळराव पाटील - ६५७
विजयसिंह मोहीते पाटील ६५४
राजीव सातव - ६२७
आनंदराव अडसूळ - ६०४ प्रश्न विचारले
लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात महिला आघाडीवर आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रीया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यासोबत विजयसिह मोहीते पाटील यांनीही सर्वाधिक प्रश्न विचारले. मात्र, टॉप पहिल्या ७ खासदारात ३ शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे शिवसेना संसदेत प्रश्न विचारण्यात आघाडीवर असल्याचे दिसते.
सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या ७ खासदारांमध्ये एकही भाजपचा खासदार नाही. त्यामुळे भाजपचे खासदार संसदेत मात्र तोंडावर बोट ठेवून बसल्याचे दिसून येते आहे.
महाराष्ट्रातील एकूण ४८ खासदारांमध्ये मुंबईतील खासदारांची उपस्थिती १०० टक्के राहिली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि भाजपचे मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची उपस्थिती १०० टक्के आहे. म्हणजेच, मुंबईच्या खासदारांचे हजेरीचे प्रमाण चांगले आहे. अरविंद सावंत यांनी १९० चर्चेत सहभाग घेतला तर २६३ प्रश्न विचारले आहेत. गोपाळ शेट्टी यांनीही २७७ प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रातील महिला खासदारांमध्ये सर्वात चांगली कामगिरी नंदूरबारच्या खासदार हिना गावित यांची आहे. तर, प्रीतम मुंडे यांची उपस्थितीही कमी राहिली. त्यानंतर शिवसेनेच्या भावना गवळी यांनीही इतर महिला खासदारांच्या तुलनेत कमी प्रश्न विचारले. पूनम महाजन आणि रक्षा खडसे यांची कामगिरी मात्र सरासरी राहिलीय.
हिना गावित
उपस्थिती ८० टक्के
३० वेळा चर्चेत सहभाग
५९६ प्रश्न विचारले.
प्रीतम मुंडे
६८ टक्के उपस्थिती
२४ वेळा चर्चेत सहभाग
८४ प्रश्न विचारले
भावना गवळी
उपस्थिती ७७ टक्के
२५ वेळा चर्चेत सहभाग घेतला.
१६९ प्रश्न विचारले.
पूनम महाजन
८४ टक्के उपस्थिती
२१ वेळा चर्चेत सहभाग
२७८ प्रश्न विचारले
रक्षा खडसे
७८ टक्के उपस्थिती
३० वेळा चर्चेत सहभाग
२७६ प्रश्न विचारले
राज्यसभेतील खासदारांचे कामकाज पाहता ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शरद पवार यांनी १४ वेळा चर्चेत सहभाग घेतला. मात्र, शरद पवार यांनी एकही प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला नाही. खासदार संजय काकडे यांची उपस्थिती केवळ २० टक्के आहे. त्यांनी एकाही चर्चेत सहभाग घेतला नाही. त्याचबरोबर केवळ ५ प्रश्न विचारले आहेत. भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी केवळ ३ वेळा चर्चेत सहभाग घेतला. शिवसेनेचा आवाज राज्यसभेत चांगला घुमत असल्याचे दिसते. खासदार संजय राऊत यांनी १ हजार ९६ प्रश्न तर, राजकुमार धुत यांनी १ हजार १८४ प्रश्न उपस्थित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर भाजप सरकार सत्तेत आलं. परंतु ते टिकवण्यात भाजपचे खासदार कमी पडताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी भाजपच्या प्रत्येक खासदारांचे प्रगस्ती पुस्तक तपासत आहेत. परंतू त्यांच्या अडीच वर्षाची कामगिरी निराशाजनक दिसते. महाराष्ट्रातून महिला खासदारांना चांगली संधी असली तरी, त्याचा पुरेपूर वापर जनतेच्या समस्या मांडण्यासाठी झाला नाही.