www.24taas.com,जयपूर
राजस्थानमधील एका मुस्लिम समाजाच्या पंचायतीने आज (गुरुवार) मुलींच्या संरक्षणासाठी त्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली. एवढेच नव्हे तर घरगुती कार्यक्रमात अथवा विवाह सोहळ्यात मुला-मुलींच्या नाच-गाण्यावर, तसेच आपल्या कुटुंबाच्या मनाविरुद्ध लग्न करण्यासही पंचायतीने बंदी घातली.
उदयपूर जिल्ह्यातील अंजुमन मुस्लिम पंचायतीने ही बंदी घातली असून, पंचायतीचे मुख्य सचिव हबिबुर रेहमान यांनी मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुस्लिम मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही कठोर पाऊले उचलली असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच हे नियम तोडणार्या् मुलींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नाहीतर कुटुंबाच्या मनाविरुद्ध आंतरजातीय लग्न करणार्या जोडप्याला हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.