नवी दिल्ली : भूमिअधिग्रहण कायद्याविरोधात काँग्रेसने रान उठवले आहे, यावर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे. भूमिअधिग्रहण हे अंबानी यांच्यासाठी करत नसल्याचं स्पष्टीकरण नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर भूमिअधिग्रहण कायद्याविरोधातील मेळाव्यात मोदी सरकार हे उद्योगपतींसाठी असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे, भूसंपादनाविरोधात गैरसमज पसरवले जात असून हे विधेयक गोरगरिबांसाठीच आहेत.
अंबानी किंवा पत्रकारांसाठी घर बांधण्यासाठी आम्ही जमीन घेत नाही. भूसंपादन विधेयकावर जनतेच्या डोळयात डोळे घालून बोला, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप नेत्यांना केले. भाजप खासदारांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सरकारने घेतलेले सर्व निर्णय गरिबांच्या हिताचे आहेत, असे सांगत सरकारच्या सर्व योजना आणि केलेली विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या सर्व खासदारांनी करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केले. मुकेश अंबानींसारख्या उद्योगपती किंवा कुण्या वृत्तपत्राच्या किंवा न्यूज चॅनलच्या मालकाचे घर बनवण्यासाठी हा कायदा नाही.
काही लोकांना आमच्या सरकारचे कौतुक करणे आवडत नाही, त्यामुळे ते आता आमच्यासंदर्भात कधीही चागलं बोलत नाही, आम्ही केलेले चांगलं काम त्यांना दिसत नाही व चांगलं ऐकूनही घेत नाही असे सांगत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
तसेच, युद्धप्रवण येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र राज्यमंत्री वी. के. सिंह यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.