www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसनंही टीका केलीय. मोदींनी मुस्लीमांची केलेली तुलना निंदनीय असून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. यातून त्यांची मानसिक विकृती दिसत असल्याचीही टीका काँग्रेसनं केलीय. तर मोदींचे मानसिक संतुलन बिघडल्याची जहरी टीका जेडीयूनं केलीय.
नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. दंगलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपल्या गाडीखाली येवून कुत्र्याचं पिलू मेलं तरी दु:ख होतं अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्या या वक्तव्यावर सपानं आक्षेप घेत मोदींनी मुस्लीम समाजाची माफी मागावी अशी मागणी केलीय. तर त्यांच्या वक्यव्याचा चुकीचा अर्थ काढणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलीय.
गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांनी प्रथमच मौन सौडलंय. २००२ साली आपण काहीही चुकीचं वागलेलो नाही असं त्यांनी म्हटलंय. निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळल्यानंतर मोदींनी दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. गुजरातमध्ये झालेल्या दंगलींबाबत मोदींनी जाहीर वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलाखतीत आपण प्रखर हिंदू राष्ट्रवादी असल्याचंही मोदींनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.